'राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष वाढवावा'

राहुल गांधींवर टीका करण्याआधी राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष वाढवावा, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

Updated: Sep 5, 2017, 11:34 PM IST
'राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष वाढवावा' title=

मुंबई : राहुल गांधींवर टीका करण्याआधी राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष वाढवावा, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी राहुल गांधींवर टीका केली होती. जोपर्यंत राहुल गांधी आहेत तोपर्यंत भाजप असेल, असं राज ठाकरे म्हणाले होते.

तसंच ज्यांना इतर पक्षामध्ये संधी वाटते ते जातात. आम्ही आमच्या पक्षाच्या विचाराशी निगडीत लोकं काम करतात. आम्ही आमचा पक्ष वाढवतो, असं सूचक वक्तव्य अशोक चव्हाणांनी राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर बोलताना केलं आहे.