मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून मेट्रो वुमन अश्विनी भिडे यांनी ट्विट करून बदलीविषयी भावना व्यक्त केली आहे. एका इंग्रजी दैनिकात प्रकाशित झालेल्या लेखाला रिट्वीट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्ही तुमचं काम निष्ठेने करता पण ज्यांनी त्यावर काम केलंय त्यांनाच काय करायला हवं हे कळतं अशा शब्दात भिडे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
U do ur job professionally & with passion. Hw it's interpreted differently by different people is out of ur control. Only those who actually work on it can hv the real understanding of what needs to be done & what was done. Rest all is perception. What matters is you do ur job. https://t.co/bIf2VjmzvI
— Ashwini Bhide (@AshwiniBhide) January 26, 2020
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्या जागी रणजीतसिंग देओल यांची भिडे यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यामध्ये महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अश्विनी भिडे यांना सचिव पदावरून प्रधान सचिव पदी बढती देण्यात आली होती. मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये वृक्षतोड करण्यात आली होती. या वृक्षतोडीला शिवसेनेसह पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात कुलाबा ते सीप्झ या मार्गावर धावणाऱ्या 'मेट्रो ३' प्रकल्पाला विरोध वाढत असतानाही अश्विनी भिडे यांनी कारशेडचा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 'आरे' भागात रात्रीच झाडे कापण्यात आल्यानंतर आंदोलकांसहीत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडे यांच्यावर टीका केली होती.