मुंबई : राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रकाशित होणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रवादीतर्फे देऊन जाहीरनामा प्रकाशित झाला नाही. आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय झाल्याने राष्ट्रवादीने स्वतःचा वेगळा जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय शेवटच्या क्षणी बदलला आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीच्या बैठकीत आघाडीची एकच जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा वेगळा जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय रद्द झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा २३ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी २ वा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, रंगस्वर हॉल मुंबई येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बांधवांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती. #NCPmanifesto @NCPspeaks
— Nawab Malik (@nawabmalikncp) September 23, 2019
लवकर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. आघाडीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आता काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित होणार आहे.
एकच जाहीरनामा असावा असा आघाडीचा आग्रह आहे. त्यामुळे आम्ही जाहीरनामा प्रकाशित करण्याचा कार्यक्रम रद्द केल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.