अशी आहेत शिवसेनेच्या वचननाम्यातील १० प्रमुख वचनं...

उल्लेखनीय म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरेंऐवजी आदित्य ठाकरे यांनी वचननाम्यावर निवेदन दिलं

Updated: Oct 12, 2019, 10:09 AM IST
अशी आहेत शिवसेनेच्या वचननाम्यातील १० प्रमुख वचनं...  title=

मुंबई : शनिवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचा स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात आधीच काही योजना जाहीर केल्या आहेत. या वचननाम्यात आणखी काही महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली आहे. वचननाम्यावर बारकोडही प्रसिद्ध करण्यात आलाय. हा बारकोड स्कॅन केल्यावर तुमच्या मोबाईलवरही हा वचननामा तुम्हाला वाचता येऊ शकेल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. उल्लेखनीय म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरेंऐवजी आदित्य ठाकरे यांनी वचननाम्यावर निवेदन दिलं. या वचननाम्यात शिवसेनेनं १० प्रमुख वचनं जनतेला दिली आहेत.

प्रथम ‘ती’

आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार

युवा सरकार फेलो

राज्यातील १५ लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी देणार

विद्यार्थी एक्स्प्रेस

तालुका स्तरावर गाव ते शाळा / महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी २,५०० विशेष बसची सेवा सुरू करणार

शेतकऱ्यांचे हित

शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रु. १०,००० प्रतीवर्षी जमा करणार

वीज दरकपात

३०० युनिट पर्यंत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार

मजबूत ग्रामीण रस्ते

राज्यातील सर्व खेड्यांतील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण आखणार

एक रुपी क्लिनिक

१ रुपयात आरोग्य चाचणी सुविधा देण्यासाठी राज्यभरात ‘१ रुपी क्लिनिक’ सुरु करणार.

सन्मान निराधारांचा

निराधार पेन्शन योजने अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार

अन्न हे पूर्णब्रह्म

१० रुपयांत सकस जेवणाची थाळी

गावातील धार्मिक स्थळांना अनुदान

राज्यातील सर्व गावांमधील पारंपारिक धार्मिक स्थळांचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन दुरूस्ती व देखभालीसाठी अनुदान देणार

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीच ७ ऑक्टोबर रोजी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. परंतु, शिवसेना आणि भाजपा युतीचा मात्र स्वतंत्र जाहीरनामा यंदा जनतेसमोर येतोय. भाजपाकडून आपला जाहीरनामा १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे.