फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच मुंबईकरांना घामाच्या धारा

साधरणत: मार्च महिना आला की उन्हाळ्याची चाहूल लागते. यंदा मात्र फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्याचा अनुभव येतोय. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 26, 2018, 10:20 PM IST
फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच मुंबईकरांना घामाच्या धारा title=

मुंबई : साधरणत: मार्च महिना आला की उन्हाळ्याची चाहूल लागते. यंदा मात्र फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्याचा अनुभव येतोय. 

रविवारी फेब्रुवारीतल्या सर्वात उष्ण तापमानाची नोंद झालीये. सांताक्रूझ वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार काल ३७ पूर्णांक ६ अंश कमाल तापमानाची नोंद झालीये. राज्यात पूर्व दिशेनं वारे वाहात असल्यामुळे तापमानात वाढ झाल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. 

गतवर्षीही फेब्रुवारीमध्ये ३८ अंश तापमानाची नोंद झाली होती. याआधी २०१२ मध्ये ३९ पूर्णांक १ आणि १९६६ साली ३९ पूर्णांक ६ अंश तापमान नोंदवण्यात आलं होतं. येत्या दोन दिवस पारा आणखी चढण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.