बैलाची जेसीबीनं अत्यंत क्रूरपणे हत्या...

एवढं क्रूर कोणी कसं असू शकतं? 

Updated: Nov 18, 2019, 07:30 PM IST
बैलाची जेसीबीनं अत्यंत क्रूरपणे हत्या...

मुंबई : क्रूरता कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकते त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. बैल पिसाळला म्हणून अत्यंत क्रूरपणे त्याला जेसीबीनं मारण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाचं व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण व्हिडिओतील भाषा मराठी आहे त्यामुळे तो महाराष्ट्रातील असल्याचं समजत आहे. 

या व्हिडिओवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'बैलाला मानवी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याची देखील शक्यता असेल. पण अशा पद्धतीने मारणं चुकीचं आहे. त्याच्यासाठी पशुवैद्यकीयांच्या इंजेक्शन देवून किंवा वन खात्याच्या मदतीने त्याच्यावर नियंत्रण मिळवता आले असते.' 

या व्हिडिओमध्ये एका दोरीला या बैलाला बंधलेलं आहे आणि पिसाळलेल्या बैलाला चक्क जेसीबीनं मारत आहेत. तरी देखील हा बैल नियंत्रणात येत नसल्याचं चित्र समोर येत आहे. परंतु त्याला नियंत्रणासाठी वापरण्यात आलेला मार्ग सुद्धा चुकीचा आहे.