उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची तयारी?, ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न

 Political News : आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके  (Rutuja Latke) यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  

Updated: Oct 12, 2022, 11:31 AM IST
उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची तयारी?, ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न title=

मुंबई : Political News : आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके  (Rutuja Latke) यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, ऋतुजा लटके यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.  (Andheri By Election 2022) त्यामुळे ऋतुजा लटके या महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार फोडण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उमेदवार ऋतुजा लटके यांना आपल्याकडे आणण्याचा शिवसेना बाळासाहेबांची अर्थात शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणि भाजप युतीची उमेदवारी त्यांना द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

ठाकरेंना मिळत असलेल्या सहानुभूतीला काटशह देण्याचा शिंदे गटाचा हा प्रयत्न आहे. भाजप नेते मुरजी पटेल यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी काम सुरु केले असले तरी भाजपने त्यांची उमेदवारी अधिकृतपणे घोषित केलेली नाही. त्यामुळे आता लटके शिंदे गटात जाणार की, ठाकरेंच्या गटातून निवडणूक लढवणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल. 

दरम्यान, आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे (Ramesh Latke Death) अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Andheri By Election 2022)  लागली आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यात आली आहे. मात्र ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात आली आहे. (Andheri by Election 2022 mahavikas aghadi candidate rutuja latke resign her bmc job but till not acepted)

ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत कार्यरत होत्या. मात्र पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. मात्र अदयाप त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आलेला नाही. ऋुतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकार होत नसल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांची धावाधाव सुरु झाली आहे. 

तर दुसरीकडे धनुष्यबाणाचा फैसला लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाविरोधात धनुष्यबाणासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आजच्या कामकाजात प्रकरण समाविष्ट नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.