महिलेच्या हाय हिल्स सँडल्समुळे बालकाचा मृत्यू

कल्याणच्या मातोश्री मंगल कार्यालयाच्या दुस-या मजल्यावर हाय हिल्सच्या सँडलमुळे महिला पाय घसरून पडली. या दुर्घटनेत महिलेजवळ असलेल्या 6 महिन्यांच्या चिमुरड्याचा घटनास्थळी मृत्यू झाला.

Updated: May 7, 2018, 08:18 AM IST

कल्याण: तुम्ही जर हाय हिल्स वापरत असाल तर, सावधान! तुमची हाय हिल्स वापरण्याची सवय एखाद्याच्या जिवावर बेतू शकते. कदाचित तुम्हाला हे पटणार नाही. पण खरोखरच अशी धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण येथील एका विवाह समारंभात एका महिलेच्या हाय हिल्स वापरण्यामुळे एका चिमूरड्याचा बळी गेला.

कल्याणच्या मातोश्री मंगल कार्यालयाच्या दुस-या मजल्यावर हाय हिल्सच्या सँडलमुळे महिला पाय घसरून पडली. या दुर्घटनेत महिलेजवळ असलेल्या 6 महिन्यांच्या चिमुरड्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. फैमिदा हमीद शेख असं या महिलेचं नाव आहे. रविवारी फैमिदा आपल्या कुटुंबीयांसोबत विवाहासाठी कल्याणला आल्या होत्या. यावेळी मंगल कार्यालयातील जीन्यावरून उतरताना हाय हिल्सच्या सँडलमुळे त्यांचा पाय घसरला आणि सहा महिन्यांचं बाळ थेट दुस-या मजल्यावरून खाली पडलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.  महिलांसाठी हाय हिल्स असणा-या  सँडल किंवा बुट  वापरणं कितीही फॅशनेबल वाटत असलं तरीही त्याचा काळजीपुर्वक वापर करणं हे ही तितकच महत्वाचं आहे.