विमानात गैरवर्तन केल्यास आयुष्यभर बंदीची शक्यता

 हे पाऊल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीच आहे.यामध्ये कायमची विमानप्रवास बंदी लादण्याचीही तरतूद आहे. 

Updated: Sep 8, 2017, 04:47 PM IST
विमानात गैरवर्तन केल्यास आयुष्यभर बंदीची शक्यता title=

मुंबई : विमान प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांवर कमीत कमी ३ महिने प्रवास बंदी घातली जाणार आहे. नो-फ्लाय लिस्टची नियमावली DGCA ने प्रथमच  शेअर केली आहे. यात गैरवर्तनाला ३ प्रकारांमध्ये विभागण्यात आले आहे. 

नागरी हवाई उड्डाण मंत्री जयंत सिन्हा म्हणाले, DGCA ने उचलले हे पाऊल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीच आहे.यामध्ये कायमची विमानप्रवास बंदी लादण्याचीही तरतूद आहे. 

दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्रालयाने एखाद्या व्यक्तीची माहिती दिली, तर त्या व्यक्तीलाही नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकले जाऊ शकते. 

अशा प्रकारामुळे येऊ शकते विमान प्रवास बंदी

१)  धमकीचा इशारा, हावभाव, मारण्याची धमकी किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असे वर्तन. यात दोषी आढळल्यास प्रवाशावर ३ महिन्यांपर्यंत विमान प्रवासबंदी लादली जाऊ शकते.

२) शारीरिक गैरवर्तनाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये धक्का देणे, पायाने मारणे, दाबून धरणे, लैंगिक अत्याचार, चुकीच्या पद्धतीने स्पर्ष करणे, असे करणाऱ्या प्रवाशांवर ६ महिन्यांपर्यंत विमानप्रवास बंदी लादली जाऊ शकते.

३) ज्यामुळे जीवावर बेतण्याची शक्यता असू शकते, अशा गैरवर्तनाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये २ वर्षे ते यापेक्षा जास्त काळापर्यंत बंदी घातली जाऊ शकते.