कशाकशाला देणार बाळासाहेबांचं नाव ?, रंगलंय जोरदार राजकारण

 बाळासाहेबांचं नाव किती प्रकल्पांना देणार ? असा सवाल भाजपनं केलाय. 

Updated: Jan 20, 2021, 05:49 PM IST
कशाकशाला देणार बाळासाहेबांचं नाव ?, रंगलंय जोरदार राजकारण

ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास, मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरुन महाराष्ट्रात पुन्हा राजकारण रंगलंय. नागपूरमधल्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात येणार आहे. त्याला विदर्भवाद्यांनी जोरजार विरोध केलाय. गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याच्या जीआर चीही होळी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरुन जोरदार राजकारण रंगलंय. कशाकशाला देणार बाळासाहेबांचं नाव ? असा सवाल भाजपनं केलाय..

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलंय. मुंबई मेट्रो ७ बाळासाहेबांचं नाव द्या, अशी रवींद्र वायकरांची मागणी आहे. चिपी विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्या, ही नारायण राणेंची मागणी आहे. कोस्टल रोडला बाळासाहेबाचं नाव देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. दुसरीकडे गोरेवाडा झुलॉजी पार्कला बाळासाहेबांचे नाव देण्यात आलंय़ तर नवी मुंबई विमानतळालाही बाळासाहेबांचं नाव देण्याचा प्रस्ताव आहे.

यामुळे बाळासाहेबांचं नाव किती प्रकल्पांना देणार ? असा सवाल भाजपनं केलाय. 

देवेंद्र फडणवीसांच्या या सवालाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देणार ? याची उत्सुकता आहे.