वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार

चाळ क्रमांक ३९ आणि ४० इथल्या रहिवाशांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला

Updated: Apr 20, 2019, 04:26 PM IST
वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार

मुंबई : मुंबईच्या वरळी भागातील बीडीडी चाळ क्रमांक ३९ आणि ४० इथल्या रहिवाशांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. गेल्या काही दिवासांपासून या इमारती शेजारी सीमेन्स कंपनीचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे इथल्या मोठमोठ्या यंत्रांमुळे इमारतीला हादरे बसत असल्याने तडे गेले आहेत. या इमारतीतले रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. 

इमारतीच्या भिंती जिर्ण झाल्या आहेत. सीमेन्स कंपनीचे दिवस-रात्र बांधकामांचे काम सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी आमचे प्रश्न समजून घेतले नाही. म्हणून आम्ही निवडणुकीचा बहिष्कार करत असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे.