उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, विधिमंडळाचा शिंदे गटाला मोठा दिलासा

एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Updated: Jul 3, 2022, 11:11 PM IST
उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, विधिमंडळाचा शिंदे गटाला मोठा दिलासा title=

मुंबई : राज्याच्या राजकारणातून आणखी एक मोठी बातमी पुढे आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच विधीमंडळ गटनेते तर भरत गोगावले (Bharat Gogavale) हेच प्रतोद असतील असं विधीमंडळाने पत्र दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा झटका लागला आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरुन हटवलं होतं. तर अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली होती. जी आता रद्द केली गेली आहे.

शिवसेनेने प्रतोदपदी सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची नियुक्ती केली होती. ती पण रद्द केली गेली आहे. त्यांच्या जागी शिंदे गटाने केलेली भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे गटाने सुनील प्रभू यांची केलेली निवड अवैध असल्याने त्यावर आक्षेप घेतला होता. ज्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे गटाने जारी केलेले व्हिप इतर आमदारांना ही लागू होतील असं देखील या पत्रात म्हटलं आहे.