Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार ईडीच्या रडारवर?

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) ईडीच्या (Enforcement Directorate) रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

Updated: Aug 27, 2022, 09:21 PM IST
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार ईडीच्या रडारवर? title=

मुंबई : या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा (Ncp) आणखी एक नेते ईडीच्या रडारवर आल्याचं समजतंय. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) ईडीच्या (Enforcement Directorate) रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. (big breaking nationalist congress party leader rohit pawar on enforcement directorate sources info)

ग्रीन एकर कंपनीची ईडी'कडून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने पवार यांच्या कंपनी ची प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. रोहित पवार 2006 ते 2o012 या कालावधीत कंपनीचे संचालक होते.

रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

मला याबाबतची माहिती माध्यमातील वृत्तानंतर मिळाली. मी कागदपत्रं तपासून प्रतिक्रिया देईन, अशी माहिती रोहित पवार यांनी झी 24 तासला दिली.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x