"आता महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार"; भाजपकडून जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा करण्याची घोषणा

गीतकार अवधूत गुप्ते होणार कार्यक्रमात सहभागी

Updated: Sep 25, 2022, 05:56 PM IST
"आता महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार"; भाजपकडून जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा करण्याची घोषणा title=

मुंबई : मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवापाठोपाठ (Ganeshotsav) भाजपने (bjp) नवरात्रोत्सवही (Navratri) जोरदार साजरा करण्यात तयारी केली आहे. मुंबई भाजपतर्फे (bjp) मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी भाजपने मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. मुंबईत 49 ठिकाणी थेट भाजपतर्फे गरबा (garba), दांडिया (dandiya) आणि भोंडला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. (BJP celebrate Navratri festival in Mumbai)

याबाबत माहिती देण्यासाठी भाजप (bjp) आमदार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गीतकार संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते (avadhoot gupte) हे देखील उपस्थित होते.

"महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात हिंदू सण उत्सवांवर कठोर निर्बंध आले होते. कोरोना निर्बंधांच्या नावाखाली गणपतीवर निर्बंध लादायचे आणि दुसऱ्या बाजूला विशिष्ट धर्मियांना त्यांच्या कार्यक्रमांसाठी परवानगी द्यायची असे प्रकार राजरोसपणे ठाकरे सरकारच्या काळात सुरु होते. मात्र, आता महाराष्ट्र हिंदुत्ववादी सरकार आलं असून आता मुंबईत दहीहंडी आणि गणपतीच्या पाठोपाठ नवरात्रोत्सवही जल्लोषात साजरा होणार आहे," असे मिहीर कोटेचा यांनी म्हटलं आहे.

शिवडीच्या अभ्युदय नगरमधील शहीद भगतसिंह मैदानावर नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी वैशाली सामंत तसेच अनेक कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पास घेतल्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे. 

मराठी दांडिया होत असल्याचा अभिमान - अवधूत गुप्ते

"मुंबईत मराठी दांडियाचे आयोजन होत असल्याचा मला आनंद आहे. या कार्यक्रमात मला  गायला मिळणार आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असून त्यासाठी मी भाजपचे खूप आभार मानतो. या कार्यक्रमात देखील मी भोंडला गाणार आहे. या कार्यक्रमात मराठी गीतांना अधिक प्राधान्य दिले जाईल," असे अवधूत गुप्ते म्हणाले.