भाजपने नारायण राणेंचा 'तो' दावा फेटाळला

त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती.

Updated: Nov 12, 2019, 11:30 PM IST
भाजपने नारायण राणेंचा 'तो' दावा फेटाळला title=

मुंबई: भाजपने पुन्हा सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्याचा नारायण राणे यांनी केलेला दावा सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळून लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सत्ता स्थापन करायची आहे, कामाला लागा, असे आदेश दिल्याचे भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटले होते. मात्र, ते नारायण राणेंचं व्यक्तिगत मत आहे. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत तशी कोणतीही चर्चा झाली नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

'सगळं अंगाशी येणार कळाल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात'

नारायण राणे यांनी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राणे भाजपचे पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्याचे संकेत दिले. मुख्यमंत्र्यांनी मला आजच्या भेटीत आपण सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करुयात, असे सांगितले. भाजपचा सदस्य म्हणून मी सत्तास्थापन करण्यासाठी जे जे करावे लागले ते करेन. मला विश्वास आहे की, भाजप लवकरच सत्तास्थापन करेल, असे राणे यांनी म्हटले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर भाजपच्या निलेश राणेंची जहरी टीका

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणेंच्या वक्तव्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असताना सुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.