मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांची सकाळपासून चौकशी सुरू आहे. ईडीच्या सापळ्यात अडकलेल्या संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असताना आता राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, पत्राचाळ घोटाळा म्हणजे शिवसेनेने मराठी माणसांच्या घरावर चालवलेला वरवंटा होता. हे निर्लज्ज आता मराठीच्या नावाने गळा कढत आहेत.
पुढे भातखळकर एक फोटो शेअर करत संजय राऊत यांची नवाब मलिक यांच्याशी तुलना केली. त्यांनी फोटो शेअर करून 'शिवसेनेचे नवाब मलिक असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी चिमटाही काढला.'
'पुढे ते म्हणाले की उध्दव ठाकरेंना काळजी लागून राहिली कारण अटक झाली तर मुलाखत कोणाला देणार? दुसरीकडे शरद पवारांनी काळजी असेल शिवसेनेत राहून राष्ट्रवादीची भांडी कोण घासणार?'
'मराठी माणसांचे गळे कापून बाळासाहेबांची शपथ घ्यायला किती निबर कातडी लागत असेल? रेक्ट कार्यक्रम सुरू झालाय. आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही. ED वाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत. घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत.'
उध्दव ठाकरेंना काळजी...
अटक झाली तर मुलाखत कोणाला देणार?
पवारांनाही काळजी...
शिवसेनेत राहून राष्ट्रवादीची
भांडी कोण घासणार?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022