मुंबई पालिका पोटनिवडणुकीत भाजपचा विजय

महापालिका पोटनिवडणूक वॉर्ड नं  २१ ( कांदीवली) मधून भाजपा उमेदवार प्रतिभा योगेश गिरकर यांचा ७१२२ मतांनी विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवाराला पराभूत  केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 14, 2017, 11:40 AM IST
मुंबई पालिका पोटनिवडणुकीत भाजपचा विजय title=

मुंबई : महापालिका पोटनिवडणूक वॉर्ड नं  २१ ( कांदीवली) मधून भाजपा उमेदवार प्रतिभा योगेश गिरकर यांचा ७१२२ मतांनी विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवाराला पराभूत  केले.

गिरकर यांना ९५९१ मते 

भाजपच्या शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. कांदिवली (पश्चिम)  प्रभाग क्र. २१ च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतिभा गिरकर यांनी ७१२२ मतांनी विजय मिळवला. प्रतिभा गिरकर यांच्या पारड्यात ९५९१ मते पडलीत.

भाजप पक्षाच्या तत्कालीन नगरसेविका शैलजा गिरकर यांच्याा निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून त्यांच्या सुनबाई प्रतिभा गिरकर यांना निवडणुकीसाठी रिंगणात उतरविले होते. 

शिवसेनेचा पाठिंबा

दरम्यान, या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे येथे शिवसेनेचा उमेदवार नव्हता. तर काँग्रेस पक्षातर्फे निलम विशाल मधाळे (मकवाणा) यांनी रिंगणात उतविण्यात आले होते. त्यांना १९८४ मते मिळालीत.

 २०० जणांनी केला नोटाचा वापर

या निवडणुकीत २०० जणांनी  नोटाचा वापर केला. एकूण ११८०४ मतदान झाले. या पोटनिवडणुकीत २८.७५ टक्के इतके मतदान झाले होते.  या निवडणुकीसाठी ६ हजार ६३१  पुरुष व ५ हजार  १७३ स्त्रिया असे एकूण ११ हजार ८०४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला.