केंद्रातील योजना जनतेपर्यत पोहोचवण्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री भरवणार जनता दरबार

केंद्रीय लघु आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांचा पहिला जनता दरबार असणार आहे. 

Updated: Oct 21, 2021, 05:18 PM IST
केंद्रातील योजना जनतेपर्यत पोहोचवण्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री भरवणार जनता दरबार

मुंबई : भाजपचे राज्यातले केंद्रीय मंत्री देखील आता जनता दरबार घेणार आहेत. एनसीपी पक्षाचे नेत्यांच्या जनता दरबार नंतर आता भाजपही जनता दरबार भरवणार आहे. केंद्रातील योजना जनतेपर्यत पोहोचवण्यासाठी भाजप हा जनता दरबार भरवणार आहे.

केंद्रीय लघु आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांचा पहिला जनता दरबार असणार आहे. येत्या शनिवारी नारायण राणे हे जनता दरबार घेणार आहेत. आगामी पालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री जनता दरबार घेणार आहेत. 

राज्यातील भाजपा नेते जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी लोकांच्या समस्या सोडवत थेट संवाद करण्याच्या सूचना भाजपा वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे समजतेय. त्यानंतर केंद्रीय मंत्र्याचा जनता दरबार भरणार आहे.