मुंबईत ४९९ धोकादायक इमारती, अनेक नागरिकांचा जीव मुठीत

कोर्ट कज्जे आणि इतर कारणांमुळे बहुतांश इमारती धोकादायक इमारती रिकाम्या करणं मनपाला शक्य झालेलं नाही

Updated: May 28, 2019, 04:32 PM IST
मुंबईत ४९९ धोकादायक इमारती, अनेक नागरिकांचा जीव मुठीत title=

कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : मुंबईत यावर्षी तब्बल ४९९ इमारती धोकादायक असल्याचं समोर आलंय. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा हजारो मुंबईकरांना धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन काढावा लागणार आहे. मागच्या वर्षी धोकादायक इमारतींची संख्या ६१९ होती. के पश्चिम वॉर्डात म्हणजे अंधेरी पश्चिम, विलेपार्ले भागात सर्वाधिक म्हणजे ५७ इमारती धोकादायक आहेत. त्यानंतर टी वॉर्डात म्हणजे मुलुंड, भांडूप या भागात ४७ इमारती धोकादायक आहेत. बी विभागात केवळ एकच इमारत धोकादायक आहे. कोर्ट कज्जे आणि इतर कारणांमुळे बहुतांश इमारती धोकादायक इमारती रिकाम्या करणं मनपाला शक्य झालेलं नाही. 

पावसाळ्यात धोकायदायक इमारती कोसळून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, याची काळजी घेताना दरवर्षी पालिकेकडून ३० वर्ष किंवा त्याहून जुन्या इमारतींचं सर्वेक्षण केलं जातं. सी-वन, सी-टू आणि सी-थ्री अशा तीन प्रकारांत धोकादायक इमारतींचे वर्गीकरण केले जाते. सी-वन प्रकारातील इमारती या राहण्यास धोकादायक असतात.

वॉर्डनिहाय धोकायदाक इमारती

एकूण धोकादायक इमारती - ४९९

के. पश्चिम वॉर्ड - ५७

टी वॉर्ड - ४७

बी वॉर्ड - ०१