हॉटेल्स व्यावसायिकांना पालिकेचा दिलासा, मालमत्ता करातून इतकी सूट

या निर्णयाला स्थायी समितीच्या बैठकीत विऱोध

Updated: Nov 5, 2020, 12:05 PM IST
हॉटेल्स व्यावसायिकांना पालिकेचा दिलासा, मालमत्ता करातून इतकी सूट  title=

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांना राहण्याची सुविधा देणाऱ्या हॉटेल्सना महानगरपालिकेनं दिलासा दिलाय. मुंबईतील १८२ हॉटेल व्यवसायिकांना मालमत्ता करता २२ कोटींची सूट देण्यात आली आहे. मात्र  या निर्णयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत विऱोध केला आहे. 

मालमत्ता करता सूट द्यायची असल्यास सर्वसामान्य मुंबईकरांना द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी  केलीय. तर क्वारंटाईनसाठी सभागृह, शाळा, हॉलही महानगरपालिकेनं ताब्यात घेतले होते. त्यामुळे त्यांनाही सूट देण्याची मागणी शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी केली. 

राऊत यांनी यासंदर्भात उपसूचना मांडली होती. हा प्रस्ताव मंजूर न करता परत प्रशासनाकडे पाठवा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. मात्र असं असूनही सत्ताधारी शिवसेनेने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय.

आकडेवारी 

सलग चौथ्या दिवशी मुंबईत एक हजाराच्या आत करोनाबाधित आढळून आले. बुधवारी ९८३ रुग्णांची नोंद झाली, तर २९ जणांचा मृत्यू झाला. तसेच एका दिवसात दुप्पट म्हणजेच १७३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता केवळ १६,५२४ रुग्ण उपचाराधीन आहेत.मुंबईतील करोना संसर्ग पुन्हा एकदा आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. रुग्ण वाढीचा दर ०.३७ टक्के इतका झाला असून, रुग्ण दुपटीचा कालावधी १८७ दिवसांवर पोहोचला आहे.