मुंबईत सरकारी केंद्रांवर आज केवळ महिलांचे लसीकरण

Covid-19 vaccination drive for women : आज मुंबईत सरकारी केंद्रांवर केवळ महिलांचे लसीकरण होणार आहे.  

Updated: Oct 9, 2021, 08:31 AM IST
मुंबईत सरकारी केंद्रांवर आज केवळ महिलांचे लसीकरण title=
Pic Courtesy : PTI

मुंबई : Covid-19 vaccination drive for women : आज मुंबईत सरकारी केंद्रांवर केवळ महिलांचे लसीकरण होणार आहे. दरम्यान, शासकीय आणि मनपा केंद्रांवर महिलांसाठी राखीव लसीकरण असणार आहे. महिलांना सर्व केंद्रांवर वॉकईन लस मिळणार आहे. लसीचा पहिला आणि दुसरा डोस आज केवळ महिलांसाठी असणार आहे. (BMC to conduct special Covid-19 vaccination drive for women)

मुंबईत महिलांसाठी लसीकरण सकाळी 10.30 ते संध्याकाळी 6.30 या वेळेत हे लसीकरण होणार आहे. सर्व शासकीय आणि मनपा केंद्रांवर महिलांना लस दिली जाणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिला लाभार्थींना थेट केंद्रावर जाऊन वॉकईन लस मिळणार आहे. 

सर्व बीएमसी आणि सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या लसीकरण केंद्रांवर घेतली जाईल. सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत ही मोहीम राबवली जाईल. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलांना या मोहिमेतील लसीकरण केंद्रांवर त्यांचा पहिला आणि दुसरा डोस मिळू शकतो. शिवाय, ऑनलाईन पूर्व-नोंदणीची आवश्यकता राहणार नाही कारण केवळ महिलांना लसीकरण केले जाईल.

बीएमसी कोविड -19 विषाणूविरूद्ध लसीकरण अधिक सुलभ आणि नागरिकांच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीएमसीचा उपक्रम, 'माझी सोसायटी, माझी जबाबदारी' 

मुंबईत पु्न्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईत 100 टक्के लसीकरण झालेल्या सोसायट्यांचा शोध आता घेण्यात येत आहे. मुंबईत सध्या 500च्यावर कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने माझी सोसायटी, माझी जबाबदारी, हा उपक्रम सुरु केला आहे. 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतीत प्रमाणपत्र चिकटविण्यात येणार आहे. लसीकरण वेगाने करण्यासाठी मनपाचा उपक्रम असल्याचे सांगण्यात येत आहे.

लसीकरण झालेल्या सोसायट्यांच्या दर्शनी भागात प्रमाणपत्र चिकटवण्यात येईल. शहरात सुमारे 90 टक्के नागरिकांना पहिला डोस मिळालाय. मात्र दुसरा डोस पूर्ण झालेल्यांचं प्रमाण 50 टक्के आहे. त्यामळे हा वेग वाढवण्याची गरज आहे, असे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.