बोगस डॉक्टर, ना कोणतही डिग्री ना कोणते प्रमाणपत्र तरीही दोन हॉस्पिटल

Fake Doctor : वसई - विरारारमध्ये एका मुन्नाभाईला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Updated: Dec 15, 2021, 01:38 PM IST
बोगस डॉक्टर, ना कोणतही डिग्री ना कोणते प्रमाणपत्र तरीही दोन हॉस्पिटल title=
संग्रहित छाया

मुंबई : Fake Doctor : वसई - विरारारमध्ये एका मुन्नाभाईला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या बोगस डॉक्टरकडे ना कोणतही डिग्री आणि ना कोणतेही वैदयकीय प्रमाणपत्र तरीही दोन हॉस्पिटल सुरु केली.

वसई-विरार महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी सुनील वाडकर यांना गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी अधिकृत पदवी प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले असल्याने त्यांवर ही कारवाई करण्यात आली. 

सुनील वाडकर हा वसई विरार महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी होता. सध्या ते विरार महामार्गावर 'हायवे' आणि नालासोपारा येथे 'नोबेल' अशी दोन खासगी रुग्णालये चालवत आहे. त्यांची वैद्यकीय पदवी बोगस असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे आली होती. त्यानुसार मंगळवारी पहाटे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने कारवाई करताना वाडकर याला अटक केली.

विरार पोलीस ठाण्यात या संदर्भात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस अधिनियम 1961 चे कलम 33 तसेच भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 419, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तपासात वाडकर याच्याकडे एमबीबीएसची पदवी नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर वाडकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची पदवी खरी आहे की खोटी याचा तपास करत असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.