'कोई नाचनेवाली बोलती है...' वड्डेटीवार यांना संताप अनावर, कंगनावर भडकले

कंगनाच्या वक्तव्यावर विजय वड्डेटीवारांच स्फोटक विधान 

Updated: Nov 17, 2021, 01:17 PM IST
'कोई नाचनेवाली बोलती है...'  वड्डेटीवार यांना संताप अनावर, कंगनावर भडकले  title=

मुंबई : 'एक नाची जे काही बोलतेय ते वादग्रस्त आहे. तिची लायकी नाही की महात्मा गांधींवर बोलते. असं बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे, असं स्फोटक विधान व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी केलं आहे. बॉलिवूड क्विन कंगना रानौत आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे. 

विजय वड्डेटीवार फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. तर पुढे ते म्हणाले की,'कोई नाचनेवाली बोलती है तो मै उसपर उत्तर नही देना चाहता'. विजय वडेट्टीवार यांच्या स्फोटक विधानावरून कंगनाचा हा वाद आणखी पेटणार असं दिसत आहे. 

'भिख मे मिली आझादी' या विधानाने वाद पेटला 

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या 'भिख मे मिली आजादी' या विधानाचा वाद थांबतच नाही. तोच तिने पुन्हा एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. कंगना राणौतने सोशल मीडियावर महात्मा गांधींना भुकेले आणि धूर्त संबोधणारी पोस्ट शेअर केली आहे. 'भगतसिंग यांना फाशी द्यावी', अशी महात्मा गांधींची इच्छा होती, असेही तिने म्हटले होते.

कंगनाने इंस्टा स्टोरीवर एका जुन्या वृत्तपत्रातील एक लेख शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, तुम्ही एकतर गांधींचे चाहते किंवा नेताजींचे समर्थक असू शकता. तुम्ही दोघे असू शकत नाही. ते तुम्हीच ठरवा.

'गाल पुढे करून स्वातंत्र्य मिळत नाही' दुसरं वादग्रस्त वक्तव्य 

कंगनाने लिहिले आहे की, 'ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांना त्यांच्या मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. कारण त्यांच्यात ना हिम्मत होती ना रक्त उकळले होते. ते सत्तेचे भुकेले आणि धूर्त होते. हे तेच लोक होते ज्यांनी आम्हाला शिकवले की जर कोणी तुमच्या एका गालावर कानशिलात मारली तर दुसरा गाल त्याच्यासमोर ठेवा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. अशा माणसाला स्वातंत्र्य मिळत नाही, फक्त भीक मिळते. हुशारीने तुमचा नायक निवडा