... तर मुंबईकरांची 'तुंबई' पासून सुटका नाहीच

हिंदमाता परिसरामध्ये पाण्याचा निचरा कशा प्रकारे होऊ शकतो

Updated: May 6, 2021, 11:35 AM IST
... तर मुंबईकरांची 'तुंबई' पासून सुटका नाहीच  title=

ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई : दरवर्षी मूसळधार पावसात मुंबईची तुंबई होते. विशेषकरून मुंबई शहरातील सखल भागांत पावसात पाणी भरण्याच्या समस्या जाणवतात. मुंबईत थोडाजरी पाऊस पडला तर सर्वातआधी हिंदमाता परीसरात पाणी साचायला सुरवात होेते.

 यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून बीएमसीने हिंदमाता परीसरात जमिनीअंतर्गत पाण्याच्या २५०० क्यूबीक मीटर टाक्या तयार केल्या आहेत.  मात्र या टाक्यांमध्ये जमा झालेल्या पाण्याचा समूद्रात निचरा करण्यासाठी या मार्गात येणारे नॅशनल टेक्सटाईल मिल्स विरोध करत आहे.

त्यामुळे मुंबईत अतीमूसळधार पाऊस पडल्यावर पुन्हा मुंबईची तुंबई होऊ शकते. याच संदर्भात स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय वस्त्र उद्योगमंत्री स्मृती ईराणी यांच्याकडे पत्रव्यव्हारही केला मात्र त्यांच्या मंत्रालयाने मुंबईच्या हिताच्या प्रकल्पाला विरोध कायम ठेवल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलंय. केंद्राने या मार्गाला विरोध केला तर यंदाही मुंबईकरांची तुंबई पासून सुटका होणार नाही असंच चित्र आहे. 

 याच संदर्भात खासदार राहुल शेवाळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांनी बातचित केली आहे. 

हिंदमाता परिसरामध्ये पाण्याचा निचरा कशा प्रकारे होऊ शकतो. 

१) हिंदमाता भूमीगत पाणीसाठा २५०० क्यूबीक मीटर

२) सेंट झेवियर्स मैदान भूमीगत पाणीसाठा ४०,००० क्यूबीक मीटर

३) प्रमोद महाजन उद्यान भूमीगत ६०,००० क्यूबीक मीटर पाणीसाठा

असे एकूण १ लाख २५०० क्यूबीक मीटर पाणीसाठा हिंदमाता परीसरातील जमिनीखाळी साठवला जाणार आहे. मात्र एव्हढ्या मोठ्या पाणीसाठ्याचा विसर्ग करण्यासाठी केंद्र सरकार अडथळा आणत असल्याचं खासदार राहुल शेवाळे सांगत आहेत