लोकलच्या डब्यातून धूर, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

central railway News : मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा स्थानकावर सकाळी अचानक लोकल गाडीतून धूर येऊ लागल्यामुळे मोठी धावपळ उडाली. परिणामी मध्य रेल्वे प्रवाशांना आज लेटमार्कचा फटका बसला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 17, 2024, 09:10 AM IST
लोकलच्या डब्यातून धूर, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

central railway latemark news in marathi : मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा स्थानकावर शनिवारी, सकाळी अचानक लोकल गाडीतून धूर येऊ लागला. मुंब्रा स्थानकात लोकल थांबली असताना ही घटना घडली. लोकलमधून धूर येतो हे पाहताच लोकलमधील प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. सकाळी 6.10 वाजता अंबरनाथहून सीएसएमटीच्या दिशेने येण्यास निघालेल्या धीम्या लोकलमध्ये हा प्रकार घडला. गाडीतील सेकंड क्लासच्या पुढच्या डब्यातून अचानक धूर येण्यास सुरुवात झाल्याने ही गाडी मुंब्रा स्थानकात थांबवण्यात आली होती. त्यामुळे धीम्या मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशीराने धावत होत्या. या घटनेमुळे ठाणे स्थानकात लोकल तुडूंब भरून गेली. परिणामी कांजूरमार्ग स्थानकात उतरणाऱ्यांना प्रवाशांना गर्दीमुळे घाटकोपर स्थानकांत उतरावे लागले. एकंदरीत ऐन गर्दीत ही घटना घडल्यामुळे प्रवाशांना लेटमार्कचा मनस्ताप सहन करावा लागला.