मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सरकार कार्यरत झाले असून लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी चेहरा असलेले छगन भुजबळ यांनी केली आहे. तसंच मराठा समाजानंही आत्महत्या न करता शांततेनं आंदोलन करण्याचं आवाहनही छगन भुजबळ यांनी केलं आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या चेंबूर इथे अभिवादन करण्याकरता, छगन भुजबळ आले होते.