चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत. गेल्या तासाभरापासून ठाकरे आणि पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे.

Updated: Nov 23, 2017, 02:03 PM IST
चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल title=

मुंबई : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत. गेल्या तासाभरापासून ठाकरे आणि पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे.

येत्या ७ डिसेंबरला विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणूकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा मिळावा यासाठी शिवसेनेला साकडं घालण्यासाठी पाटील मातोश्रीवर गेले आहेत.

नारायण राणेंनी राजीनामा दिल्यावर विधानसभेची एक जागा रिकामी झालीय. त्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत राणे स्वत: उतरण्याची शक्यता आता मावळलीय. 

आता भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा मिऴावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत