Sanjay Raut ED Inquiry| छगन भुजबळांनी सांगितलं की ED तपास सुरू झाला की पुढे काय होतं..

संजय राऊत यांच्यावर ED ची टाच आली आहे. पत्राचाळ प्रकरणात त्यांची संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे

Updated: Jul 31, 2022, 11:57 AM IST
Sanjay Raut ED Inquiry| छगन भुजबळांनी सांगितलं की ED तपास सुरू झाला की पुढे काय होतं.. title=

मुंबई : संजय राऊत यांच्यावर ED ची टाच आली आहे. पत्राचाळ प्रकरणात त्यांची संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. ईडीच्या या कारवाईवर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 
 
संजय राऊत यांच्यावर ही कारवाई अपेक्षित होतीच. एकदा ईडीचा तपास सुरू झाला की त्यांचे ऑफिस, घर चेक करतात. इथे भुजबळ फार्मवर पण किती वेळा धाडी पडतात, मोजता येत नव्हत्या एवढ्या पडल्या तपासाचा तो भाग आहे. 

संजय राऊत यांना अटक होणार की नाही याबाबत विचारलं असता छगन भुजबळ यांनी अटक होईल की नाही त्याबाबत बोलू शकणार नाही असं उत्तर दिलं आहे.

व्हायरल झालेल्या राऊतांच्या ऑडिओ क्लीपवर काय म्हणाले....

संजय राऊतांच्या ऑडिओ क्लिप बाबत माहिती नाही, पोलिस चौकशी करतील, खऱ्या खोट्या गोष्टींना उत येत असतो. अर्जुन खोतकरांचे वक्तव्य ऐकले तर ते बोललेच की मी आणि कुटुंब अडचणीत आल्याने शिंदे गटात जातो आहे. आतापर्यंत आपण म्हणत होतो पण आता तिकडे जाणारेही सांगतायत अजून काय बोलायचे?