Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : ठाकरे पिता-पुत्रांना शिंदे शिवसेनेकडून डिवचण्याचा प्रयत्न, जोरदार बॅनरबाजी

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत बॅनर वाॅर दिसून येत आहे. (Banner war in Shinde and Thackeray's Shiv Sena) माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जाणार आहेत. त्या मार्गावर  शिंदे गटाकडून शिवसेनेचे बॅनर लावण्यात आलेत.  

Updated: Mar 10, 2023, 11:51 AM IST
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : ठाकरे पिता-पुत्रांना शिंदे शिवसेनेकडून डिवचण्याचा प्रयत्न, जोरदार बॅनरबाजी title=

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2023) मुंबईत बांद्रा ते विलेपार्ले परिसरात शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत बॅनर वाॅर दिसून येत आहे. (Banner war in Shinde and Thackeray's Shiv Sena) माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जाणार आहेत. त्या मार्गावर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आले होते. (Shiv Sena Banner war) दरम्यान, उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जाणार होते. त्याच मार्गावर शिंदे गटाकडून शिवसेनेचे बॅनर लावण्यात आलेत. शिंदे गटाकडून ठाकरे पिता पुत्रांना डीवचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. (Maharashtra Political News)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बांद्रा ते विलेपार्ले परिसरात शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत बॅनर वाॅर दिसून आले आहे. पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे हे विलेपार्लेच्या कार्यक्रमास मातोश्रीहून निघण्यापूर्वीच मुंबई विमानतळ रस्त्यापर्यंत शिवसेनेकडून शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असलेले बॅनर लागायला सुरुवात केली. ऊद्धव ठाकरे यांच्यासमोर शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात येत असलेलं हे शक्तीप्रदर्शन मानलं जात आहे. राष्ट्रीय कर्मचारी संघटनेकडून पश्चिम ऊपनगरात शिंदे यांचे बॅनर लागण्यात आले आहेत.

दरम्यान, नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणं जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. महाल इथल्या शिवतीर्थ शिवाजी महाराज चौकात शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून शिवजयंती साजरी करण्यात येतेय. सकाळी  महाराजांना रुद्राभिषेक आणि त्यानंतर आरती तसंच ढोल ताशा पथकाचं वादन होणारेय. उपराजधानीत आज दिवसभर शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.