मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आवाहन भाजपला खटकले, पाहा काय केलं?

राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव यावरुन आता विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे.  

Updated: Apr 14, 2020, 08:48 AM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आवाहन भाजपला खटकले, पाहा काय केलं? title=

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव यावरुन आता विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी सगळ्यांची पुढाकार घ्यायला हवा, असे म्हटले. तसेच 'तुम्ही खबरदारी घ्या, जबाबदारी आमची', असे सांगत कोरोनाविरोधातील लढा कायम असल्याचे सांगत हा लढा आपण जिंकणारच, असा आत्मविश्वास जनतेला दिला. मात्र, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी भाजपकडून याबाबत राजकीय आरोप करण्यात येत आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी  पक्षीय राजकारण नको. मदतीची गरज आहे, असे म्हटले आणि भाजपला ते चांगले खटकल्याचे दिसून येत आहे.

पक्षीय राजकारण थांबले पाहिजे, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आवाहन भाजपला चांगलेच झोंबल्याचं दिसत आहे. कारण भाजप समर्थकांनी यावर चार व्यंगचित्रं तयार केली आहेत. सर्वसामान्य जनता आपल्या तक्रारी मांडतेय, समस्या सांगतेय. भाजपचे चार नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार लोकांना धीर देत आहेत. 'थोडं थांब, असे ते म्हणत आहेत. राजकारण करायचं नाही', असं सांगून भाजप नेते जनतेची समजूत काढताना या कार्टूनमध्ये दाखवले गेले आहे.