Urfi Javed : चित्रा वाघ आता उर्फी जावेद बद्दल असं काही बोलल्या आहेत की...

नेमही कपड्यांवरुन टीका करणाऱ्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले उर्फी जावेदच्या (Urfi Javed) कपड्यांचेच कौतुक केले आहे. असं घातलं तरी काय आहे उर्फीने... 

Updated: Jan 29, 2023, 11:26 PM IST
Urfi Javed : चित्रा वाघ आता उर्फी जावेद बद्दल असं काही बोलल्या आहेत की... title=

Chitra Wagh Vs Urfi Javed: मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed)  आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला. यामुळे या दोघींमध्ये सतत शाद्बिक चकमक होत असते. आता मात्र, या दोघी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत.  चित्रा वाघ यांनी चक्क उर्फी जावेदचं कौतुक केलं आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांचे कौतुक  केले आहे.

मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ विरुद्ध अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातला वाद चांगलाच गाजत आहे. पण सध्या उर्फी पूर्ण कपडे घालून फिरत असल्याचं सांगत चित्रा वाघांनी तिचं कौतुक केले. विरोध कुणा महिलेला किंवा धर्माला नाही. कुणी सुधारत असेल तर कौतुक करायला हवं, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद वर आपल मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या की माझा विरोध हा कुठल्याही महिलेला आणि त्याच्या धर्माला नाही. तो विरोध विकृतीला आहे.आणि कधी कौतुक देखील केलं पाहिजे आणि सध्या ती महिला पूर्ण कपड्यांमध्ये दिसत आहे. सारखं सारखं बोलू नका कोण सुधरत असेल तर त्याच कौतुक केलं पाहिजे. सध्या ती चांगल्या कपड्यांमध्ये दिसत आहे. अस यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या.

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला

सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी  जावेद विरोधात  पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांनी उर्फी जावेदच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर अंधेरी येथील अंबोली पोलिसांनी उर्फीची चौकशी केली होती. 

उर्फीची महिला आयोगाकडे तक्रार

चित्रा वाघ त्यांच्या कार्यकर्त्यांसह आपल्यावर हल्ला करु शकतात, तेव्हा  चित्रा वाघ यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी उर्फी जावेदनं महिला आयोगाकडे केली होती. राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जात चित्रा वाघ यांच्या चौकशीची विनंती केली होती. ट्टिटरच्या माध्यमांतून धमक्या देण्यासारखे प्रकार घडत असल्याचेही तिने महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.  उर्फीच्या तक्रारीची दखल घेत महिला आयोगाने उर्फीला सुरक्षा पुरवावी अशा सूचना केल्या होत्या.