CIDCO Lottery 2022: आनंदवार्ता! सिडकोच्या चार हजार घरांसाठी आज सोडत

CIDCO Lottery  : ज्या लोकांनी सिडकोमध्ये फार्म भरला त्यांचासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज कळणार आहे, कोणाला मिळणार आहे हक्काचं घर. 

Updated: Nov 23, 2022, 07:40 AM IST
CIDCO Lottery 2022: आनंदवार्ता! सिडकोच्या चार हजार घरांसाठी आज सोडत title=
cidco lottery 2022 Navi Mumbai 4 158 houses 23 November 2022 nmp

CIDCO Lottery 2022 Navi Mumbai : सिडकोमध्ये अर्ज दाखल केलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिडकोच्या (CIDCO Lottery 2022) चार हजार घरांसाठी आज सोडत निघणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आलेली 4 हजार 158 घरांची सोडत आज निघेल. या सोडतीसाठी 16 हजार अर्ज दाखल झाले आहेत. 

या घरांसाठी निघणार सोडत

सिडकोने परवडणाऱ्या घरांसाठी अनामत रक्कम वाढवल्यामुळे अर्ज संख्या यावेळी कमी झालीय. आज दुपारपर्यंत या सोडतीतील चार हजार लाभार्थी कोण ते संगणक सोडतीने जाहीर होईल. ही सर्व घरं नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या सिडकोने विकसीत केलेल्या नोडमध्ये आहेत. (cidco lottery 2022  Navi Mumbai 4 158 houses 23 November 2022)

दरम्यान, यापूर्वी गणेशोत्सवाच्या वेळी सिडकोने तब्बल 4,158 घरांची आणि 245 व्यापारी गाळ्यांची लॉटरी काढली होती. नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सिडको एक लाख घरे उपलब्ध करणार असून आतापर्यंत जवळपास 25 हजार घरे सिडकोने विकली आहेत.