MHADA मागेमाग CIDCO Lottery संदर्भात मोठी बातमी; स्वत:चं घर घेण्यासाठी आता...

Cidco Lottery 2024 : म्हाडा लॉटरी जाहीर होण्यासाठीच्या हालचालींना वेग मिळालेला असतानाच आता सिडकोच्या सोडतीतील घरांसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे.   

सायली पाटील | Updated: Aug 7, 2024, 07:57 AM IST
MHADA मागेमाग CIDCO Lottery संदर्भात मोठी बातमी; स्वत:चं घर घेण्यासाठी आता...  title=
cidco lottery 2024 waiting period increases know the reason homes prices and other details

Cidco Lottery 2024 : म्हाडाच्या (Mhada Lottery 2024) वतीनं येत्या काळात म्हणजेच राज्यात विधानसभा निवडणूक (Vidhansabha election 2024) जाहीर होण्याआधीच आगामी सोडत जाहीर करण्यात येणार असून, सोडतीला निकालही आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जारी केल्या जाण्याच्या हालचाली पाहायला मिळत आहेत. इथं म्हाडाच्या सोडतीकडे अनेकांच्याच नजरा लागलेल्या असताना तिथं आता नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी विविध गृहप्रकल्प उभारणाऱ्या सिडकोकडूनही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

सिडकोच्या विविध नोडमध्ये सुरु असणाऱ्या गृहप्रकल्पाच्या कामांना वेग मिळतोय खरा. पण, या प्रकल्पांचा समावेश असणारी सोडत नेमकी केव्हा जाहीर केली जाणार याचीच अनेकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. इच्छुकांनी सातत्यानं सोडतीसंदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केलेली असतानाच काहीसं हिरमोड करणारं वृत्त समोर आलं आहे. 

प्राथमिक स्वरुपात सिडकोच्या काही घरांची सोडत स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर जाहीर केली जाण्याची चिन्हं दिसत असतानाच आता ही शक्यता मात्र विरळ होताना दिसत आहे. थोडक्यात सिडको लॉटरीच्या प्रतीक्षेक असणाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार हे स्पष्ट चित्र दिसत आहे. 

हेसुद्धा वाचा : मुंबईकरांसाठी Good News! म्हाडानं ठरवली लॉटरीची तारीख? लोकेशन एकदा पाहाच!

 

काही दिवसांपूर्वीच सिडकोनं लांबणीवर पडलेली तळोजा, द्रोणागिरी येथील 3322 घरांसाठीची सोडत जाहीर केल्यानंतर नव्या सोडतीकडेच घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचं लक्ष होतं. 

कुठे उपलब्ध असतील सिडकोची घरं? 

आगामी सोडतीच्या अनुषंगानं सिडको सध्या वाशी, जुईनगर, मानसरोवर, खारघर, खांदेश्वर अशा भागांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 25 हजार घरांची बांधणी करत आहे. लहान आणि मोठ्या आकारांच्या घरांचा यामध्ये समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. (Navi Mumbai) नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या परिसरांमध्ये या घरांची उभारणी होत असल्यामुळं मोठ्या संख्येनं इच्छुंकाचं लक्ष याच सोडतीकडे लागलं असून, आता म्हाडाप्रमाणं सिडकोही सोडतीबाबत कधी एकदा सकारात्मक बातमी देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.