Mumbai News Today: सलमान खानच्या घरावर फायरिंग प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मात्र, या दोघांच्या चौकशीनंतर वेगळीच माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस सध्या मामा नावाच्या व्यक्तीच्या शोधात आहेत. हाच मामा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे. 14 एप्रिल रोजी अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी या घरावर दोन जणांनी गोळीबार केला होता. सुरुवातीला या प्रकरणात बिश्नोई गँगचे नाव समोर येत होते. मात्र या दोन्ही हल्लेखोरांना ऑर्डर्स देणारा व्यक्ती मामा असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात 1,735 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात या संशयास्पद मामा नावाच्या व्यक्तीचे नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांचा दावा आहे की, हल्लेखोर विक्की गुप्ता आणि सोनू पाल यांना याच मामाने हल्ल्या करण्यासाठी पैसै आणि हत्यार दिले होते. मामा आणि दोघे हल्लेखोर यांच्यात 9 मिनिटांची एक ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल होत आहे. विक्कीच्या मोबाइलमध्ये ही ऑडिओ क्लिप पोलिसांना सापडली आहे. या ऑडिओ क्लिप्समध्येही हल्लेखोर मामा नावाने कोणालातरी संबोधित करत आहेत.सलमान खानच्या घरावर हल्ला करणाऱ्या बिश्नोई गँगचा आणि या मामाचा काय संबंध, याचा शोध पोलिस घेत आहेत.
सलमान खानच्या घरावर झालेल्या फायरिंग प्रकरणी सोनू, विक्की यांच्यासह 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकाचा तुरुंगातच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये हल्लेखोर विकी गुप्ता ते अनमोल बिश्नोई यांच्या झालेल्या संभाषणाच्या व 9 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपचाही समावेश आहे.
अनमोल बिश्नोईः मी मामासोबत बोललो आहे. ते म्हणताहेत असं नको व्हायला की, सरेंडर व्हायला लागेल. सरेंडर देवाकडेच व्हायचं कुठे दुसरीकडे व्हायची गरज नाहीये.
विक्की गुप्ताः तुमचं मामासोबत बोलणं झालंय?
अनमोल बिश्नोईः मामासोबत झालं बोलणं
विक्की गुप्ताः आताच मामासोबत बोलणं झालं आहे. भाईजी जसं तुम्ही दोघं भाऊ आहात लॉरेन्स सर आणि तुम्ही तसंच मी माझ्या भावाचा नंबर पाठवतो आणि तुमचा ही नंबर त्याला पाठवतो. जर दुसऱ्या दिवशी मी पकडलो गेलो तर तुम्ही त्याला संपर्क करा. माझं मामासोबतही बोलणं झालं आहे आणि मी माझ्या भावाला सगळं काही सांगितलं आहे.