मुंबई : सिडको गृहनिर्माण योजना २०१८च्या यशानंतर आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी पंतप्रधान आवाज योजने अंतर्गत सिडको लवकरच तब्बल ७९ हजार ७७१ घरांची योजना राबवणार आहे. या गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी करणार आहेत. या योजने अंतर्गत नवी मुंबईमधील तळोजा, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, वाशी तसंच ट्रक टर्मिनल्स आणि रेल्वे स्थानकाजवळच्या परिसरात ही घरे बांधण्यात येणार आहेत. ही भव्य गृहप्रकल्प योजना तीन वर्षात पूर्ण केली जाणार असून तीन टप्य्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबईची वाढ आणि त्या निमित्ताने घरांची वाढती मागणी लक्षात घेता सदर गृहनिर्माण योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सिडकोतर्फे सदर गृहनिर्माण योजना नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे. या गृहनिर्माण योजनेतील 89,771 घरांपैकी 53,493 घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तर 36,288 घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी आहेत.
या गृहनिर्माण प्रकल्पाकरिता 18,000 कोटींचा खर्च येणार आहे. सिडकोच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा गृहनिर्माण प्रकल्प ठरणार आहे.