मुंबईसह इतर ठिकाणी पाऊस आला मोठा!

पावसाच्या सरींना सुरुवात.....   

Updated: Jun 1, 2020, 06:10 AM IST
मुंबईसह इतर ठिकाणी पाऊस आला मोठा!  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Kerala केरळमध्ये Monsoon मान्सूनचं आगमन होत असताना आणि हलक्या पावसाच्या सरींचा वर्षाव होत असतानाच इथे हवामान खात्यानं Mumbai मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये जोरदार Rain पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला. ३ आणि ४ जून या दिवसांसाठी या भागांमध्ये ऑरेंज आणि रेड असे अलर्ट अर्थात सावधगिरीचे इशारेही देण्यात आले. 

हवामान खात्यानं दिलेला हा अंदाज वेळेआधीच खरा ठरल्याचं सोमवारी पहाटेच्या सुमारास स्पष्ट झालं. काही दिवसांपासून उष्णतेचं वाढतं प्रमाऩ साऱ्यांनाच बेजार करत असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास ढगांचा गडगडट होण्यास सुरुवात झाली, सोबतच वीजाही कडाडू लागल्या. पुढच्या अवघ्या काही मिनिटांमध्येच मुंबईच्या या तप्त धरणीवर पावसाचे थेंब बरसण्यास सुरुवाचत झाली. 

 

पाहता पाहता पहाटे सुरु झालेल्या या पावसाच्या अनपेक्षित सरींनी मुंबई आणि आजूबाजूचा परिसर चिंब केला. हा मान्सूनचा पाऊस नसला तरीही चक्रीवादळाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरावर झालेली ही बरसात वातावरणात हलकासा गारवा आणून गेली आहे. त्यामुळं जून महिन्याच्या आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात अनेक ठिकाणी अनेकांसाठी सुखावह गेली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

चक्रीवादळाचा इशारा 

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे १ जूनला काही भागात वाऱ्यासह थोड्या पावसाचा अंदाजही भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढच्या १२ तासात पूर्वपश्चिम आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्यानंतरच्या २४ तासात पूर्वोत्तर अरबी समुद्रावरील चक्री वादळामध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे.