भाजपचा नवा नारा, 'फिर एक बार देवेंद्र सरकार'

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच भाजपच्या निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा.

Updated: Oct 1, 2019, 07:26 PM IST
भाजपचा नवा नारा, 'फिर एक बार देवेंद्र सरकार'  title=

मुंबई : भारतीय जनता पार्टीकडून आजच विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. त्यानंतर लगेचच सोशल मीडियावर भाजपचा जोरदार प्रचार सुरु झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच भाजपच्या निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा असल्याचं दिसून येत आहे. 

त्याप्रमाणेच आता #isupportdevendra ही मोहीम भाजपाकडून सुरु करण्यात आलीय. ट्विटरवर याला चांगला प्रतिसाद असून त्यासोबत देव गाथा, मी देवेंद्र, महाराष्ट्र घडतोय, देवेंद्रच येतोय असे फोटो व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे स्पष्ट आहे की भाजपाच्या प्रचाराचा चेहरा देवेंद्र फडणवीसच आहेत. 

गेल्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हेच प्रचारात अधिक होते. 'फिर एक बार मोदी सरकार' हेच घोषवाक्य पक्षाच्या प्रचारात होते. पण राज्यात प्रचार सुरु झाल्यावर यावेळेला मात्र 'फिर एक बार देवेंद्र सरकार'चे नारे सोशल मीडियावर दिले जात आहेत.