पवारांना तुम्ही कधी रडताना पाहिलंय ? मजबूत...कणखर....शरद पवार जेव्हा हळवे होतात

तुम्ही शरद पवारांना कधी रडताना पाहिलं आहे का? शरद पवार जे वयाच्या 80 व्या वर्षी आजही म्हणतात की, मी दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. तेच शरद पवार आतून

Updated: Oct 1, 2019, 06:19 PM IST
पवारांना तुम्ही कधी रडताना पाहिलंय ? मजबूत...कणखर....शरद पवार जेव्हा हळवे होतात title=

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : तुम्ही शरद पवारांना कधी रडताना पाहिलं आहे का? शरद पवार जे वयाच्या 80 व्या वर्षी आजही म्हणतात की, मी दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. तेच शरद पवार आतून किती हळवे आहेत, हे पहिल्यांदाच एका व्हिडीओतून समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणा दरम्यान शरद पवारांना अश्रू अनावर झाल्याचं व्हिडीओतून दिसून येत आहे.

हा व्हि़डीओ राजारामबापू जन्मशताब्दी कार्यक्रमातील असल्याचं दिसून येत आहे. पवारांच्या जिभेचा आणि गळ्यातील काही मासाचा भाग टेस्टसाठी देण्यात आला होता. तरी देखील ते सक्रीय होते. 

तसेच पवारांचं वय 80 आहे. या वयात पायाचं हाड मोडलं तर माणूस वाकतो, झुकतो, तरी देखील पवारांनी फक्त 21 दिवसांनी पुन्हा पक्षासाठी झोकून दिल्याचं यावेळी जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

जितेंद्र आव्हाड यांचे हे शब्द जेव्हा कार्यक्रमात बसलेल्या पवारांच्या कानी पडले, तेव्हा पवारांना हुंदके आवरण कठीण झालं आणि तरी देखील दुसऱ्या क्षणाला पवारांनी आपले अश्रू कसे तरी आवरले.

हे तेच पवार आहेत, कणखर, पहाडासारखे आणि तेवढेच हळवे ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकांना आसमान दाखवलंय. पवारांचा आजही, या वयातही शरद पवारांचा संघर्ष सुरूच आहे.

संबंधित व्हिडीओ हा एका लोकल यूट्यूब चॅनेलचा आहे. शरद पवारांना अश्रू अनावर झाल्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.