मुंबई : शेतक-यांना आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.
युपीए सरकारपेक्षा दुपटी, तिपटीने कर्जमाफी करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कर्जमाफीसाठी एक समिती तयार केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
शेतकरी संपाचा दुसऱ्या दिवशी राज्यभर शेतकरी आंदोलन तीव्र झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि सरकारी पातळीवर चिंतेचे वातावरण होतं. ही संपाची कोंडी कशी फोडायची, याची चिंता मुख्यमंत्र्याना होती.
शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्र्यानी आंदोलन करणाऱ्या किसान क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक जयाजीराव सुर्यंवशी यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना चर्चेसाठी वर्षावर आमंत्रित केलं.
रात्री उशिरा शेतकरी नेते वर्षावर पोहचले. आणि तब्बल चार तास मुख्यमंत्र्याशी चर्चा केल्यानंतर आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा पहाटे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.