चहावाल्यांच्या नादी लागू नका, तुम्ही नामशेष व्हाल- मुख्यमंत्री

पवार साहेब, चहावाल्यांच्या नादी लागू नका, तुम्ही नामशेष व्हाल असा इशाराच फडणवीसांनी राष्ट्रवादीला दिला.

Updated: Apr 6, 2018, 04:02 PM IST
चहावाल्यांच्या नादी लागू नका, तुम्ही नामशेष व्हाल- मुख्यमंत्री  title=

मुंबई : पवार साहेब, चहावाल्यांच्या नादी लागू नका, तुम्ही नामशेष व्हाल असा इशाराच फडणवीसांनी राष्ट्रवादीला दिला. शिवाय हल्ला बोल नव्हे, डल्ला मारो यात्रा असल्याचं मुख्यमंत्र्यानी भाषणात म्हटलंय. बीकेसीत भाजपच्या महामेळाव्यात बोलाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं. चहापान घोटाळ्याविषयी पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्तुत्तर दिलं. 
 जे चहावाल्यांच्या नादी लागले त्यांची २०१४ च्या निवडणुकीत दैना उडाली, यातुन तरी त्यांनी बोध घ्यावा असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच २०१९ मध्ये भाजपाचाच झेंडा असेल असा विश्वासही त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला.

अमित शहा यांच्या भाषणातले मुद्दे

काँग्रेसच्या कार्यकाळात दहशतवादी सीमेपर्यंत घुसले होते, भाजपनं त्यांच्या सीमेत जाऊन जवानांच्या मृत्यूचा बदला घेतला

काँग्रेसच्या काळात १२ जवानांना जिवंत जाळण्यात आलं होतं, पण आम्ही पाकिस्तानात घुसून त्यांना मारलं

भाजपचा सुवर्णकाळ तेव्हा येईल जेव्हा पश्चिम बंगाल, ओडिसा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजप जिंकून येईल

राहुल गांधी आणि शरद पवार SC/ST कायद्यावर अफवा पसरवत आहेत

आम्ही जनतेमध्ये चर्चेस तयार... भाजप आरक्षण कधीही रद्द करणार नाही 

मोदींच्या नेतृत्वाखाली देशात कमळ फुललं... विकासाच्या मुद्यावर २०१९ ची निवडणूक जिंकू

राहुल गांधींना पवारांनी इंजेक्शन दिलं - 

राहुलबाबा आमच्याकडे चार वर्षांचा हिशोब मागत आहेत... पण, चार पिढ्या तुमच्याकडे हिशोब मागत आहेत,  राहुल गांधींवर टीका

राज्यात घरोघरी जाऊन कामांची माहिती द्या, कार्यंकर्त्यांना आवाहन