शिवसेनेच्या वर्धापन दिनला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार

शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन उद्या बुधवारी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात साजरा होणार आहे.

Updated: Jun 18, 2019, 09:29 PM IST
शिवसेनेच्या वर्धापन दिनला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार title=

मुंबई : शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन उद्या बुधवारी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खास उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला पहिल्यांदाच दुस-या पक्षातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उद्या संध्याकाळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा युती भक्कम असल्याचा संदेश याद्वारे दिला जाणार आहे.

लोकसभेप्रमाणं महाराष्ट्र विधानसभा निवडणूकही शिवसेना आणि भाजपानं एकदिलाने लढावी आणि मोठा विजय मिळवावा, यासाठी युतीचे वरिष्ठ नेते यानिमित्तानं एकाच व्यासपीठावर येणार आहेत.