मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; मुलाकडूनही वडिलांचं अनुकरण

अखेर कारण समोर... 

Updated: Aug 8, 2022, 12:40 PM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; मुलाकडूनही वडिलांचं अनुकरण  title=
cm eknath shinde and son shrikant shinde turned off comment box of all social media handle

मुंबई : बऱ्याच दिवसांच्या सत्तानाट्यानंतर महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन करण्यात आलं. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि पाहता पाहता सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सचा आकडा जबरदस्त वाढला. 

पदभार स्वीकारल्या क्षणापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक कारणांनी सर्वांच्या नजरा वळवल्या. नुकताच त्यांनी असा एक निर्णय घेतला, ज्यामुळं पुन्हा एकदा त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. 

आता म्हणे मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील कमेंट बॉक्सचं सेक्शन बंद केलं करण्यात आलं आहे.  महाविकासआघाडीसोबत सत्तेत असतेवेळी शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी केली आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. (cm eknath shinde and son shrikant shinde turned off comment box of all social media handle)

दरम्यानच्या काळात ते सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह झाले पण, त्यांच्यावर टिकेची झोडही उठवण्यात आली. ज्या कारणास्तव आता त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील कमेंट्स बंद करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांप्रमाणेच त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीही सोशल मीडियावरील कमेंट सेक्शन बंद केल्याचं पाहायला मिळत आहे. 

परिणामी यापुढे मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना त्यांच्या फोटो, व्हिडीओ किंवा इतर कोणत्याही पोस्टवर कमेंट करता येणार नाही.