मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरचा डीपी बदलला, शपथ घेतना म्हणाले होते...

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या घडामोडींना वेग आला आहे.

Updated: Jun 30, 2022, 08:07 PM IST
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरचा डीपी बदलला, शपथ घेतना म्हणाले होते... title=

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री आहेत. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी ईश्वरसाक्ष शपथ घेतो की' अशी सुरुवात करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी पूर्ण झाल्यावर समर्थकांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनात जाऊन कामाला सुरुवात केली आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्विटरवरील फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे. 

शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरील फोटो बदलला आहे. या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पायाशी बसलेले दिसत आहे. या फोटोमुळे शिवसेना नेमकी कोणाची? असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडला आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे 39 आमदार आहे. 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आम्ही बाहेरुन पाठिंबा देणार असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. पण केंद्रीय भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी  फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं असा आग्रह केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याही माहिती जे. पी. नड्डा यांनी दिली . पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कार्यभार सांभाळलेले देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत.