CM Uddhav Thackeray Speech : मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद 

Updated: Nov 22, 2020, 08:25 PM IST
CM Uddhav Thackeray Speech : मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे  title=

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊन दरम्यान लोकांना आलेल्या वाढीव वीजबिलांवरुव विरोधक टीका करत आहेत. जर राज्यातील जनता ही नाराज आहे. मनसेनं सरकारला इशारा दिला आहे. तसेच मोर्चा देखील काढणार आहे. या मुद्द्यांना मुख्यमंत्री आपल्या भाषणातून हात घालतील अशी अपेक्षा होती. पण त्यांचे आजचे भाषण हे कोरोनाच्या काळजी संदर्भातील होते.  देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना वाढता धोका पाहता अनेक शहरांमध्ये रात्री कर्फ्यू लागू आहे. मुंबईवरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका आहे. या पार्श्वभुमीवर हा संवाद महत्वाचा मानला जातोय.

कोरोनाचे संकट अद्याप टळले नाहीय. त्यामुळे गाफील राहू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी जनतेला केले. 

भाषणातील महत्वाचे मुद्दे 

दुसरी लाट ही त्सुनामी आहे का अशी भीती वाटतेय. आपली आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा सज्ज आहे. पण त्यांच्यावर किती ताण द्यायचा ? हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना सहकार्य करणं हे आपलं काम आहे. 

सर्वकाही खुलं केलंय म्हणजे कोरोना गेलाय असं समजू नका. गर्दी झाली तर कोरोना मरणार नाही तर कोरोना वाढणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना घातक ठरतो. आताच्या लाटेत तरुणांना देखील संक्रमण होतंय. हे फार गंभीर आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष करुन तरुण घरी वावरले तर ज्येष्ठांना त्रास होणारे. 

अद्यापही लस हातात आली नाही. राज्यात १२ ते साडे बारा कोटी जनता आहे. यात पहिला आणि दुसरा डोस द्यावा लागेल. याचा अर्थ २४ कोटी डोस द्यावे लागणार आहेत. लस कोणत्या तापमानात ठेवायची ? कशी ठेवायची हे प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत. तोपर्यंत मास्क घाला, हात धुवा, अंतर पाळा हीच त्रिसूत्री पाळायला हवी. 

कोविड होऊन गेल्यानंतर त्याचे दुष्परीणाम होतायत. पोस्ट कोविड हे गंभीर आहे. 

अनावश्यक ठिकाणी जाऊ नका, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका आणि लक्षण वाटली तर चाचणी जरुर करुन घ्या असे आवाहन 

वॅक्सिन येईल तेव्हा येईल. कोरोनापासून चार हात लांब राहा.