दहीहंडीबाबत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय, काय आहे भूमिका?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वाचा निर्णय 

Updated: Aug 23, 2021, 02:24 PM IST
दहीहंडीबाबत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय, काय आहे भूमिका?  title=

मुंबई : सण जपले पाहिजेत, पण आरोग्याचा विचार करावा लागले, दहीहंडीसंदर्भातल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतली महत्वाची भूमिका.  आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दहीहंडी होणार का? या बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत. पण आता प्रश्नं आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल. 

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

दहीहंडी साजरी करणारच, असा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी दिलाय. नियम पाळून करु, पण दहीहंडी साजरी करणार, असं त्यांनी म्हटलंय. याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की,' आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा...! '.

बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं. वँक्सीन घेतल्यावर देखील काही देशांत लाँकडाऊन करण्यात आलंय. इस्त्रायल ने तर पुन्हा मास्क घालायला सुरवात केली. अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोट आहेत. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे. एकदा हे संकट पुर्णपणे घालवूयात. आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही आहोत. नीती आयोगाने जे सांगितलंय.. ते लक्षात घेतलं पाहीजे.  गेल्या दिड वर्षात आपण जी आरोग्य सेवा वाढवलीय ती इतर कोणत्याही राज्याने वाढवलेली नाहीये. 

आपण दूस-या लाटेत डाँक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलोय. आता जी विंडो आपल्याला मिळालीय.  तीचा वापर आपण थोडं अर्थ चक्र सावरण्यासाठी करूयात. पुन्हा ती काळरात्र नकोय. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ समजूतीने गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल. 

अजित पवार, उपमुख्यमंत्री काय म्हणाले? 

तिसरी लाट जगातील अनेक देशांत आलेली आहे. सर्व धर्मियांच्या सणांना महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या सुरक्षेची काळजी घेत निर्णय घेतले त्याला जनतेनेही सहकार्य केले. जे आता पर्यंत आपण सगळं सांभाळलंय.  त्यामुळे आपल्याला कठोर भूमीका घ्यावी लागेल... मर्यादीत स्वरूपात करण्याची मागणी होतेय... पण तेही धोकादायक ठरू शकते... आपण सर्वांनी सहकार्य करावे.

इक्बाल चहल,आयुक्त BMC

ICMR  आणि नीती आयोगाने तीसरी लाट येणार सांगितलंय त्यावेळ ४ लाख केसेस दर दिवशी येऊ शकतात.२ लाख ICU लागतील.सप्टेंबर मध्ये तीसरी लाट येऊ शकते. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे. आपण यंदा उत्सव टाळला पाहीजे.

हेमंत नगराळे,आयुक्त, मुंबई पोलिस

गेले काही महिने आपण निर्बंधात असल्यामुळे आपण दूसर्या लाटेवर नियंत्रण मिळवू शकलो आहे. आता दहीहंडी नतर लगेच गणेशोत्सव येणार आहे. आपण आता दहीहंडी उत्सवाला थोडी शिथिलता दिली तर पुढे गणेशोत्सव मंडळं देखील थोडी शिथिलता मागतील. त्यामुळे आपण आता सावध भूमीका घेतली पाहीजे.

सिताराम कुंटे,मुख्य सचिव

अर्थ चक्र सुरू ठेवण्यासाठी आपण काही निर्बंध शिथील केले आहेत... पुन्हा आपल्याला लाँकडाऊनकडे जायचं नाहीये... त्यामुळे आपल्याला सावध रहावंच लागेल

दहीहंडी समन्वय समिती ची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी.

१) आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी.
२) दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे.
३) गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत. 
४) कोविड १९ संसर्गाची जाणिव ठेवुनच सुरक्षित दहीहंडी उत्सव  आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी.
५) दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.