महाराष्ट्रात पडणार कडाक्याची थंडी, उत्तर भारत गारठला

 हिमालयात पश्चिमी चक्रावत सक्रिय झाल्याने उत्तर भारत गारठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात  थंडीचा कडाका आणखी तीव्र होईल.

Updated: Dec 7, 2021, 11:39 AM IST
महाराष्ट्रात पडणार कडाक्याची थंडी, उत्तर भारत गारठला
PIC : PTI

मुंबई : नोव्हेंबरचा पहिला आठवडा गेला तरी म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. मात्र, नोव्हेंबरच्या सुरुवातीला अवेळी पाऊस झाला. त्यामुळे गवेत गारवा जाणवत होता. आता राज्यात गुरुवारपासून कडाक्याची थंडी पडणार आहे. तसा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Cold snap in Maharashtra)

हिमालयात पश्चिमी चक्रवात सक्रीय झाले आहे. थंडवारे हिमालयाकडून महाराष्ट्राकडे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात दोन दिवसांत थंडी वाढणार आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्यातील पाऊस पूर्णपणे ओसरला आहे. हिमालयात पश्चिमी चक्रावत सक्रिय झाल्याने उत्तर भारत गारठण्यास सुरुवात झाली आहे. ( North India to see temperature dropping to as low ) त्यामुळे महाराष्ट्रात 9 डिसेंबरपासून थंडीचा कडाका आणखी तीव्र होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. थंडी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.