मुंबईत पारा 15 अंशावर तर दिल्लीत 5 अंशावर

आज सकाळी सकाळी प्रत्येक मुंबईकराला हुडहुडी भरली होती, कारण मुंबईत थंडीचा जोर वाढलाय. 

Updated: Jan 1, 2020, 10:56 AM IST
मुंबईत पारा 15 अंशावर तर दिल्लीत 5 अंशावर title=

मुंबई : आज सकाळी सकाळी प्रत्येक मुंबईकराला हुडहुडी भरली होती, कारण मुंबईत थंडीचा जोर वाढलाय. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत थंडीचं आगमन झालंय. मुंबईकरांनी २०२० च्या पहिल्याच दिवशी गारव्याचा अनुभव घेतला. मुंबईत तापनाचा पारा १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलाय. 

आता मुंबईकरांना यंदा उशीरा का होईना पण थंडी अनुभवायला मिळालीय. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच मुंबईकरांचा वर्षाखेर सर्वात कमी थंडीनं झाला. 

राजधानी दिल्लीतही रेकॉर्ड ब्रेक

राजधानी दिल्ली थंडीचे रेकॉर्ड तोडतेय. दिल्लीने थंडीच्या बाबतीत गेल्या ११८ वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. दिल्लीत सध्या ५ अंश सेल्सिअसवर तापमान आलं आहे. थंडीमुळे जनजीवन सुस्तावलं आहेच. पण दिल्लीत बेघर लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.