मोठी बातमी: काँग्रेसच्या पहिल्या यादीत ५० उमेदवार; 'या' मातब्बर नेत्यांचा समावेश

'झी २४ तास'च्या हाती काँग्रेसची पहिली यादी लागली असून या यादीत पन्नास जणांची नावे आहेत. 

Updated: Sep 20, 2019, 08:30 AM IST
मोठी बातमी: काँग्रेसच्या पहिल्या यादीत ५० उमेदवार; 'या' मातब्बर नेत्यांचा समावेश title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली जाणार आहे. यामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे आहेत. 'झी २४ तास'च्या हाती काँग्रेसची पहिली यादी लागली असून या यादीत पन्नास जणांची नावे आहेत. 

नांदेड जिल्ह्य़ातील भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण यांच्याऐवजी पक्षाने अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर दक्षिण कराडमधून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव या यादीत असल्याने ते लोकसभा पोटनिवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट होते. 

पहिल्या यादीत काँग्रेसच्या काही विद्यमान आमदारांसह काही माजी आमदारांचीही नावे आहेत. कोल्हापूर दक्षिणमधून सतेज पाटील यांच्याऐवजी ऋतुराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर हिंगोली जिल्ह्य़ातील कळमनुरी मतदारसंघातून राजीव सातव यांच्या जागी डॉ. संतोष तारफे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:

बाळासाहेब थोरात - संगमनेर
अशोक चव्हाण - भोकर 
पृथ्वीराज चव्हाण - कराड दक्षिण 
विजय वडेट्टीवार - ब्रह्मपुरी
केसी पडवी - अक्कलकुवा 
नसीम खान - चांदिवली
वर्षा गायकवाड - धारावी 
अमीन पटेल - मुंबादेवी 
यशोमती ठाकूर - तिवसा 
विश्वजीत कदम - पलूस-कडेगाव 
ऋतुराज पाटील - कोल्हापूर दक्षिण
पी. एन. पाटील - करवीर 
अमित देशमुख - लातूर 
धीरज देशमुख - लातूर ग्रामीण 
बसवराज पाटील - औसा 
मधुकर चव्हाण - तुळजापूर
वसंत चव्हाण - नायगाव, (नांदेड) 
डी पी सावंत - नांदेड उत्तर 
कैलास गोरंट्याल - जालना
कल्याण काळे - फुलंब्री 
सुरेश वरपूडकर - परभणी 
डॉ. संतोष तारफे - कळमनुरी (राजीव सातव यांच्या जागी) 
वसंत पुरके - राळेगाव
रणजित कांबळे - वर्धा 
अमर काळे - आर्वी 
सुनील केदार - सावनेर 
हर्षवर्धन सपकाळ - बुलढाणा 
माणिक जगताप - महाड 
रमेश बागवे - पुणे कँटोन्मेंट