Ajit Pawar: अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच मातोश्रीवर घडली मोठी घडामोड

Ajit Pawar:  नरभक्षक असतो तसा भाजप सत्ताभक्षक अस म्हणत उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. तर दिल्लीत गांधी कुटुंबाला भेटा, मग राहुल गांधी मुंबईला येतील, मातोश्री भेटीत वेणूगोपाल यांचं ठाकरेंना निमंत्रण.

Updated: Apr 17, 2023, 10:16 PM IST
Ajit Pawar:  अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच मातोश्रीवर घडली मोठी घडामोड title=

Maharashtra Politics : सध्या राज्यात राजकीय भूकंप होणार अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चेनुळे चर्चेत आले आहेत ते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणे अजित पवार (Ajit Pawar) देखील बंडखोरी करणार असल्याच्या चर्चेला उधणा आले आहे. अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात आहे.  अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांचे निवास्थान असलेल्या मातोश्रीवर मोठी घडामोड घडली आहे. 

राज्यातल्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग

राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार मुंबईकडे निघाले आहेत.यात अजित पवार समर्थक आमदारांचा समावेश आहे. अजित पवारांशी मुंबईत चर्चा करून ठरवणार असल्यानं मुंबईला जात असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी दिली. तर, दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडेही मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच त्यांचे दोन्ही मोबाईलही बंद असल्यानं चर्चांना उधाण आले आहे. 

मातोश्रीवर नेमकं काय घडल?

काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्ली भेटीचं निमंत्रण दिलं आहे. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी वेणूगोपाल यांनी आज मातोश्रीवर जाऊन तासभर चर्चा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि खासदार संजय राऊतही यावेळी उपस्थित होते. ठाकरेंनी दिल्लीत गांधी कुटुंबाला भेटावं. त्यानंतर राहुल गांधी मुंबईला येतील, असंही वेणूगोपाल यांनी यावेळी स्पष्ट केलं. सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावलं होते. सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी केलेल्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. यावरुनच उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात मतभेद झाले होते. 

भाजप सत्ताभक्षक

जसे नरभक्षक असतात, तसा भाजप सत्ताभक्षक आहे. सगळे विरोधी पक्ष त्यांच्याविरोधात एकत्र येणार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. नागपुर येथील वज्रमुठ सभेच देखील उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला होता. अनेकांना दारुचे व्यसन असते. दारुचे व्यसन घरं उद्धवस्त करतं.   त्याचप्रमाणे सत्तेची नशा देश उद्धवस्त करते अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.