close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शिवसेनेचा काँग्रेस - राष्ट्रवादीला दे धक्का, माजी नगरसेवक सेनेत दाखल

शिवसेनेने विरोधी पक्षातील नेत्यांना शिवसेनेत खेचण्याचा धडाका लावला आहे. 

Updated: Oct 10, 2019, 03:26 PM IST
शिवसेनेचा काँग्रेस - राष्ट्रवादीला दे धक्का, माजी नगरसेवक सेनेत दाखल

मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी शिवसेनेने विरोधी पक्षातील नेत्यांना शिवसेनेत खेचण्याचा धडाका लावला आहे. मतदान काही दिवसांवर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. वरळी मतदारसंघात येणाऱ्या भायखळ्यातले काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुनीता शिंदे आणि माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

विशेष म्हणजे पहिल्यांदात मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीत आणि आदित्य ठाकरेंच्या खास उपस्थितीत इतर पक्षातील नेत्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. जामसुतकर यांच्या पत्नी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थित शिवबंधन बांधले.